
इगतपुरीनामा न्यूज – महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि महायुतीचे वरिष्ठ नेते यांची सभा होणार आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता घोटी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात समर्थकांच्या मोठ्या गर्दीत ही प्रचार सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या सभेमुळे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांची निर्णायक विजयाकडे वाटचाल होणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर ह्या दोन्हीही तालुक्यातील प्रत्येक गाव आणि वाड्या पाडे पिंजून काढले आहेत. सगळीकडे त्यांना मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यांच्या समर्थकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडूनही गावोगावी सक्षमपणे प्रचाराची यंत्रणा काम करीत आहे. हिरामण खोसकर यांचे निवडणूक चिन्ह घड्याळ असून लोकांपर्यंत ते पोहोचले आहे. ह्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि महायुतीच्या नेत्यांची शुक्रवारी होणारी प्रचार सभा अतिशय निर्णायक ठरणार आहे. ह्या सभेला महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांनी केले आहे.