“पंजा”च येतोय – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उद्या त्र्यंबकला जाहीर सभा : गरिबांचा उमेदवार लकीभाऊ जाधव यांच्या विजयासाठी राष्ट्रीय अध्यक्षांचे विशेष लक्ष

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेसचे उमेदवार युवा योद्धा लकीभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय इंदिरा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उद्या गुरुवारी प्रचारसभा होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे सकाळी ११ वाजता ही विराट प्रचार सभा होत असून ह्या प्रचारसभेला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजर असणार आहेत. ह्या सभेद्वारे लकीभाऊ जाधाव यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा होणार असून हजारो नागरिकांची उपस्थिती राहणार असल्याची शक्यता आहे. लकीभाऊ जाधव यांनी जवळपास संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे, उर्वरित गावांचा दौरा शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. मतदारसंघातील तरुणांचे आयडॉल असणाऱ्या लकीभाऊ जाधव यांना गावोगावी प्रचंड प्रतिसाद आणि आशीर्वाद लाभत आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांची प्रचारसभा गाजवण्यासाठी महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांनी नियोजन पूर्ण केले असल्याचे सांगण्यात आले. या सभेला सर्वांनी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेसचे उमेदवार युवा योद्धा लकीभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय इंदिरा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उद्या गुरुवारी प्रचारसभा होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे सकाळी ११ वाजता ही विराट प्रचार सभा होत असून ह्या प्रचारसभेला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजर असणार आहेत. ह्या सभेद्वारे लकीभाऊ जाधाव यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा होणार असून हजारो नागरिकांची उपस्थिती राहणार असल्याची शक्यता आहे. लकीभाऊ जाधव यांनी जवळपास संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे, उर्वरित गावांचा दौरा शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. मतदारसंघातील तरुणांचे आयडॉल असणाऱ्या लकीभाऊ जाधव यांना गावोगावी प्रचंड प्रतिसाद आणि आशीर्वाद लाभत आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांची प्रचारसभा गाजवण्यासाठी महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांनी नियोजन पूर्ण केले असल्याचे सांगण्यात आले. या सभेला सर्वांनी हजर राहण्याचे आवाहन काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल, शहराध्यक्ष आकाश जयप्रकाश छाजेड आणि  नाशिक जिल्हा/शहर काँग्रेस कमिटी यांनी केले आहे.

इंदिरा काँग्रेसला मागील अडीच दशकांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील लाभलेले अध्यक्ष म्हणजे मल्लिकार्जुन खरगे हे आहेत. तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभला आहे. कर्नाटकचे ऐंशी वर्षीय मापण्णा मल्लिकार्जुन खरगे गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले खरगे हे एस. निजलिंगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते आणि जगजीवन राम यांच्यानंतर या पदाचा सन्मान मिळणारे दुसरे दलित नेते आहेत. वारावट्टी बिदर येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या खरगे यांनी शालेय शिक्षणानंतर कलबुर्गी येथे पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतले. राजकारणात येण्यापूर्वी ते वकिली पेशात होते. ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या खरगे यांच्या राजकीय प्रवासात चढ-उतार आहेत. गुलबर्गा कलबुर्गी येथून केंद्रीय नेतृत्व पदापर्यंत त्यांनी राजकीय प्रवास केला. गरिब आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लकीभाऊ जाधव यांचा विजय सोपा करण्यासाठी स्वतः मल्लिकार्जुन खरगे यांनी लक्ष घातले असल्याचे वृत्त आहे.

Similar Posts

error: Content is protected !!