भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी विधानसभेचे उमेदवार लकीभाऊ जाधव हे महाराष्ट्र राज्यातील युवाशक्तीचे आयडॉल आहेत. मतदारसंघाच्या गुजरात सीमेपासून ते इगतपुरीपर्यंतच्या तरुणांनी त्यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ज्या गावात अद्याप लकीभाऊ जाधव हे पोहोचले नाहीत त्या गावातील मतदार त्यांची वाट पाहत आहेत. कुठलाही नकारात्मक विचार न करता मतदार त्यांनाच मतदान करणार असल्याचे सांगत आहेत. अन्य उमेदवारांची गब्बर आर्थिक परिस्थिती आणि कुडाच्या घरातील गरिबांचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांची गरिबीची परिस्थिती लक्षात घेतली जात आहे. उलट अन्य उमेदवारांकडे लुटेरे मतदार सातत्याने जा ये करत आहेत. प्रत्येक गावातील युवकांचे नेटवर्क लकीभाऊ जाधव यांच्या विजयासाठी एक एक क्षण कामाला लागले आहेत. काँग्रेस पक्षाची विचारधारा, श्रीमंत विरुद्ध गरीब उमेदवार, गब्बर विरुद्धचा निर्णायक लढ्यामुळे सर्वसामान्य माणसाने ही निवडणूक अतिशय निर्णायक वळणावर आणून ठेवली आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव यांचा विजयाचा मार्ग सोपा झालेला दिसतो आहे.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आपल्या संघटन कौशल्याने आदिवासी आणि सर्वसामान्य लोकांसाठी लकीभाऊ जाधव गेली पंधरा वर्ष क्रियाशील आहेत. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसने त्यांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. त्यांची उमेदवारी जड जाईल ह्या भीतीने मतांचे विभाजन करण्याचा डाव विरोधकांनी टाकला आहे. आघाडीच्या नेत्यांनी अन्य उमेदवाराला साथ देण्याची उघड भूमिका घेतली आहे. मात्र लकीभाऊ जाधव यांनी आपल्या कृतिशील कौशल्याने मातब्बर नेत्यांसाठी काम करणारे सर्व कार्यकर्ते व मतदार यांचा चांगलाच विश्वास संपादन केल्याचे दिसते. अभूतपूर्व पद्धतीने गावागावात लकीभाऊ जाधव यांचे वाजतगाजत स्वागत होत असून गरिबांचा वाली म्हणून लोकांनी त्यांना पसंती दिली आहे. २० तारखेला सर्वसामान्य उमेदवार विरुद्ध गब्बर उमेदवार यांचा अटीतटीचा सामना लकीभाऊ जाधव यांनी जिंकावा यासाठी सामान्य माणूस आणि युवाशक्ती अखंड परिश्रम घेत आहेत. गब्बर अधिकाधिक गब्बर झाले असून गरिबांच्या लेकराला एक संधी दिल्यास इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ विकासासाठी देशात नावारूपाला येईल. यासाठी लकीभाऊ जाधव यांना निवडून आणण्यासाठी सर्व यंत्रणा झटून काम करीत आहे.