दिलासादायक : कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

इगतपुरी तालुक्यात आज १५ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला. कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या वैद्यकीय अहवालानुसार फक्त ७ व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. आज दिवस अखेर इगतपुरी तालुक्यातील सर्व कोविड सेंटरमध्ये एकूण ६५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.

तालुक्यात आज अखेर एकूण ६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तीन अंकी संख्येवरून महत्प्रयासाने रुग्णसंख्या दोन आकडी संख्येवर आली आहे, त्यामुळे त्यात वाढ होणे ही धोक्याची घंटा ठरू नये ही जबाबदारी तालुक्यातील सर्व घटकांची आहे, विनाकारण घराबाहेर पडू नये, गरज भासल्यास सर्व काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, कोरोना नियमावलीचे पालन करावे, मास्कचा वापर करण्यात हयगय न करता सगळ्यांनी योग्य पद्धतीने मास्कचा वापर करावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.