आदिम आदिवासी कातकरी समाजाचा महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना जाहीर पाठिंबा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांचा आम्हाला सार्थ अभिमान असून त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. येत्या २० तारखेला त्यांच्या घड्याळ निशाणीसमोरचे बटण दाबून त्यांना विजयी करावे असे आवाहन आदिम आदिवासी कातकरी समाजाचे प्रतिनिधी तथा श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकुळ हिलम यांनी केले आहे. विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी केलेले विकासाचे कार्य आणि समाजकार्य आम्ही जवळून पाहत आलो आहोत. जी कामे सरकारी यंत्रणेने करणे अपेक्षित आहेत ती त्यांनी आपल्या माध्यमातून केली आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्या दृष्टीने आमची सामाजिक बांधिलकी म्हणून आदिम आदिवासी कातकरी समाजामार्फत हिरामण खोसकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आमचे इगतपुरी विधानसभा मतदारसंघात असलेले सगळे सगे सोयरे मित्र मंडळी यांना घरी जाऊन भेटून आपल्या प्रचाराबाबत प्रचंड बहुमताने निवडून आणण्याबाबत सांगितले असल्याचे गोकुळ हिलम यांनी सांगितले.

Similar Posts

error: Content is protected !!