
इगतपुरीनामा न्यूज – छावा मराठा संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सुनील भोर यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना पाठिंबा घोषित केला आहे. येत्या २० तारखेला सर्व कार्यकर्त्यांनी हिरामण खोसकर यांना मतदान करून विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघात संघटनेची मोठी शक्ती असून या मतदारसंघाला विकसित करावे अशी आमची भूमिका आहे. ह्या भूमिकेनुसार महायुतीचे हिरामण खोसकर निश्चितच विकासाचे राज्य आणतील. यासाठी छावा मराठा संघटना महाराष्ट्र राज्य त्यांना संपूर्ण सहकार्य करणार आहे. कार्यकर्त्यांनी तातडीने कामाला लागून हिरामण खोसकर यांना मताधिक्य द्यावे असेही आवाहन संस्थापक अध्यक्ष सुनील भोर यांनी केले आहे.