इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हेकडे जाणाऱ्या रस्त्यावर बरशा नावाच्या वळणावर स्कुटीवरील नियंत्रण सुटल्याने आज साडेसात वाजेच्या सुमाराला अपघात झाला. ह्या अपघातात दोन युवती गंभीर जखमी तर एक युवक किरकोळ जखमी झाला. तिघेही जखमी धामणगाव येथील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे समजते. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना एसएमबीटी रुग्णालयात दाखल केले आहे.
MH 17 C 07778 ह्या स्कुटीवरून प्रवास करणारे धनश्री खेमनर वय 22, स्नेहल चौकी वय 23, दोघी राहणार संगमनेर आणि करण देशमुख वय 25 रा. पंढरपूर सध्या राहणार एसएमबीटी हे बेलगाव कुऱ्हे रस्त्याने बरशा भागातुन प्रवास करत होते. यावेळी वळणावर त्याचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामध्ये धनश्री आणि स्नेहल गंभीर जखमी तर करण हा किरकोळ जखमी झाला. अपघाताबाबत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना एसएमबीटी रुग्णालयात दाखल केले.