इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, रिपाइं आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रचाराला सुसूत्रता आली आहे. दोन्ही तालुक्यातील गावागावात प्रचाराची यंत्रणा पोहचली असून मतदारांनी श्री. खोसकर यांना निवडून आण्यासाठी कंबर कसून काम करणार असल्याचे सांगितले. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, रिपाइं आणि मित्रपक्ष यांचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधून सूत्रबद्ध प्रचारयंत्रणा राबवण्यासाठी वज्रमूठ बांधली आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवून मतदारसंघाला समृध्द करण्यासाठी निर्णायक लढा दिला जाणार आहे. शेवटच्या टोकावरील कार्यकर्ता ते थेट महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्याशी जास्तीत जास्त संपर्क साधून सर्व मित्रपक्षांनी विजयाचा गुलाल घेण्यासाठी सज्जता ठेवली आहे.
इगतपुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षातर्फे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना अधिकृत उमेदवारी घोषित झालेली आहे तेव्हापासून महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, रिपाइं आणि मित्रपक्ष यांचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी रात्रंदिवस मेहनतीने प्रचार करत आहेत. एकमेकांशी संवाद आणि प्रचाराचे व्यवस्थापन चोखपणे केले गेले आहे. यामुळे हिरामण खोसकर यांना मतदारांकडून पसंती लाभली आहे. महायुतीच्या सर्व मित्रपक्षांचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी गावागावात कार्यकर्त्यांच्या कायम संपर्कात असल्याने हिरामण खोसकर यांच्या विजयाची वज्रमूठ पक्की झाली असे म्हणावे लागेल. स्वतः हिरामण खोसकर महायुतीतील सर्व घटक पक्ष आणि पदाधिकारी यांच्या संपर्कात राहून सर्वांना प्रचाराचे मार्गदर्शन करीत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण झाल्याचा फायदा घेतला जातोय.