माजी आमदार निर्मला गावित तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी सुसज्ज : पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या प्रचाराच्या फौजफाट्याला मतदारांचा प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार निर्मला गावित यांना सर्वत्र उत्तम प्रतिसाद लाभत आहे. अपक्ष उमेदवारी घोषित करून त्यांनी आपणही सक्षमपणे लढायला तयार असल्याचे सांगितले आहे. निर्मला गावित यांच्यासोबत दोन्हीही तालुक्यातील पदाधिकारी सक्रियतेने प्रचारयंत्रणेत सहभागी झाले असून यावेळी निवडून येण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. गावोगावी आणि वाड्यावस्त्या पिंजून काढल्या जात आहेत. यावेळी मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याने निर्मला गावित यांच्या उत्साहात भर पडली आहे. इगतपुरी विधानसभा निवडणुकीत निर्मला गावित यांचा करिष्मा अजूनही लोकांमध्ये असल्याने ह्या निवडणुकीत निश्चितपणे विजय संपादन करू असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराला गती येणार आहे.

२००९, २०१४ मध्ये निर्मला गावित यांनी इंदिरा काँग्रेसतर्फे इगतपुरी विधानसभा निवडणुकीत विजयश्री मिळवला होता. २०१९ ला त्यांचा विजयी रथ अडवण्यासाठी विरोधकांनी एकजूट करून त्यांचा निसटता पराभव केला होता. यावेळी त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी स्वतंत्रपणे अपक्ष लढा देण्याचे निश्चित केले आहे. दहा वर्षात त्यांनी केलेली शाश्वत विकासकामे, कार्यकर्त्यांची उभारलेली फळी, वाढता जनसंपर्क पाहता निर्मला गावित मोठ्या जोमाने विजयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वपक्षीय पदाधिकारी सोबतीला असल्याने निवडणुकीत रंग भरला गेला आहे. प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, पाडे यांमध्ये निर्मला गावित यांचा जिव्हाळ्याचा संपर्क आहे. त्यांच्याकडे जनतेसाठी विकासाचा परिणामकारक अजेंडा आहे. यानुसार त्यांचे व्हिजन मतदारांना आकर्षित करीत आहे. निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराला आणि घडामोडीला गतिमानता येणार आहे. या निवडणुकीत माजी आमदार निर्मला गावित यांच्यामुळे आमदारकीची लढाई तीव्र होणार आहे.

Similar Posts

error: Content is protected !!