इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार युवा नेतृत्व लकीभाऊ जाधव यांच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन प्रगतीपथावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्भव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करण्यासाठी लकीभाऊ जाधव यांना निवडून द्यावे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास साधण्यासाठी सर्वांनी एकजुटीने धनशक्तीला घरचा रस्ता दाखवून महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव उमेश खातळे यांनी केले आहे. लकीभाऊ जाधव यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे संपूर्ण ताकदीने काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिव उमेश खातळे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभाप्रमुख सुभाष जाधव, ओबीसी तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोंडे, युवक कार्याध्यक्ष सोमनाथ घारे, आदिवासी सेल अध्यक्ष सागर साबळे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब खातळे, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष अमजद पटेल, इगतपुरी शहराध्यक्ष आकाश पारख, विद्यार्थी अध्यक्ष तेजस भोर, केशव बोडके, सागर टोचे, आदित्य जाधव, नामदेव शिंदे, तुकाराम येलमामे, गोकुळ जाधव, विजय घारे, बस्तिराम खातळे, दिपक नागरे, साहेबराव गायकर, धनाजी महाले, शंकर गोवर्धने, गणेश मेदडे, धनराज जाधव, निवृत्ती गवारी, योगेशराव गायकर, दत्तु गायकर, योगेशराव धांडे, वैभव धांडे, संपत नाठे, रोशन जाधव, गणेश खकाळे, मनोज वाजे, भिका पानसरे, वैभव धांडे, संदीप तांबे, वैभव पाटील, राहुल क्षिरसाठ, अशोक सोनवणे, संपत भरित, योगेशराव सुर्यवंशी आदींची नियोजन बैठक पार पडली. ह्या बैठकीत महाविकास आघाडीच्या सोबत संपूर्ण ताकदीने उभे राहून लकीभाऊ जाधव यांची प्रचारयंत्रणा भक्कम करण्याचा निर्णय घेण्यात आला. साध्या गरीब कुटुंबातील उमेदवार लकीभाऊ जाधव विरुद्ध संपूर्ण धनाढ्य शक्ती असा हा लढा विजयी करण्यासाठी डोळ्यात तेल घालून काम करण्याची सर्वांनी शपथ घेतली.