इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात इंदिरा काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याबद्धल मतदारसंघात पसरलेली माहिती अफवा आहे. महाविकास आघाडी तथा इंदिरा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लकीभाऊ जाधव हे गोरगरीब आणि सामान्य जनतेचे बुलंद नेतृत्व म्हणून इगतपुरी मतदारसंघात निवडून येणार आहे. त्यांचे मताधिक्य घटवण्यासाठी काही व्यक्ती जाणूनबुजून अफवा पसरवत आहे. उद्या मंगळवारी हजारो कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत. यावेळी इंदिरा काँग्रेस आणि मित्रपक्षांची ताकद सर्वांना दाखवून देऊ. लकीभाऊ जाधव हे इगतपुरी तालुक्यातील गावातले अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील उमदे उमेदवार आहेत. त्यांच्यात तालुक्यात निवडून येण्याची क्षमता असल्याने त्यांना उमेदवारी दिली असून पक्षाने घेतलेला निर्णय काँग्रेस पक्ष आणि आम्ही पदाधिकारी सार्थ करून दाखवू असा आत्मविश्वास काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे यांनी “इगतपुरीनामा” सोबत बोलतांना व्यक्त केला.
इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा मी सुपुत्र असून ह्या मतदारसंघातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी गेली पंधरा वर्ष कार्यरत आहे. लोकसभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीसोबत प्रामाणिकपणे काम करतांना मी गोरगरीब जनतेच्या योजनांचा पैसा व्यर्थ गेल्याचे जवळून पाहिले आहे. ठराविक लोकांची समृद्धी झाली असून मतदारसंघातील सगळे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. इंदिरा काँग्रेस आणि महाविकास आघाडीने मला इथली उमेदवारी देऊन माझ्या मायबाप मतदारांची सेवा करायची जबाबदारी दिलेली आहे. आता सामान्य नागरिक सुज्ञ झाले आहेत. त्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचून तळागाळातील माणसे मला निवडून देणार आहेत. माझ्या महाविकास आघाडी, इंदिरा काँग्रेस, मित्रपक्ष यांची खरोखरची ताकद उद्या उमेदवारी अर्ज भरतांना आम्ही दाखवून देऊ अशी प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव यांनी दिली. दरम्यान लकीभाऊ जाधव यांचा मतदारसंघात यापूर्वीच जनसंवाद दौरा सफल झाला असून उद्या नाशिकमध्ये मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातुन कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत.