इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले आणि त्यांचे सुपुत्र बाळासाहेब झोले यांनी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत बाळासाहेब झोले यांनी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी उमेदवारी करणार नसल्याचे आज जाहीर केले आहे. पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी याबाबत शिवराम झोले आणि बाळासाहेब झोले यांना विनंती केली होती. त्यानुसार विनंतीला सन्मान देऊन आमदार हिरामण खोसकर यांना दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी सक्रिय होणार असल्याचे आज सांगण्यात आले. हिरामण खोसकर यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याचे श्री. झोले पितापुत्रांनी आश्वासन दिले. यामुळे महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना अनेक ठिकाणाहून भरघोस पाठिंबा मिळत आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची असल्याने सामान्य जनतेचे अधिकाधिक बहुमोल मतदान हिरामण खोसकर यांना मिळवून देणार असल्याचे माजी आमदार शिवराम झोले, बाळासाहेब झोले यांनी सांगितले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group