इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
भारत सरकारच्या युवा एवं खेल मंत्रालय , नेहरू युवा केंद्र नाशिक यांच्यावतीने प्रजासत्ताक दिन २०२२ ला समर्पित देशभक्ती आणि राष्ट्रवादावर आधारित “भाषण स्पर्धा” सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या विषयांवर जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा संपन्न झाली. ह्यामध्ये १८ ते २९ वयोगटातील ४५ स्पर्धक सहभागी होते. या जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत नाशिकच्या शुभम जोशी याने प्रथम क्रमांकाचे पहिले ५ हजारांचे बक्षीस पटकावले आहे. रिषु पांडे याने द्वितीय क्रमांक २ हजार आणि इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील गायत्री शिंगोटे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तिने सन्मानपत्र आणि १ हजारांचे रोख बक्षीस पटकावले आहे. इगतपुरी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. तिची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
तरुणांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रवादाची भावना जागृत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेचे पंच म्हणून मोहम्मद आरिफ खान, डॉ. रूपेश बिजर, प्रा. प्रकाश वारकरी यांनी काम पाहिले. नेहरू युवा केंद्र नाशिक जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी, लेखापाल सुनील पंजे, दिलीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली भाषण स्पर्धा यशस्वीतेसाठी इगतपुरी तालुका राष्ट्रीय युवा स्वंसेवक ॐकार गायकर यांनी परिश्रम घेतले.