महेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदे दुमाला येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जन माणसांसाठी कृतीबद्ध काम करणारे तत्कालीन तहसीलदार महेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. गोंदे दुमाला येथील सिद्धिविनायक विद्यालयातील कामगारांच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. इगतपुरीनामा न्यूज पोर्टलचे संपादक भास्कर सोनवणे आणि रुग्णमित्र निवृत्ती गुंड पाटील यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून महेंद्र पवार हे काम पाहत आहेत. दोन्ही तालुक्यात सर्वोत्तम काम उभे करणारे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात असे कौतुक मुख्याध्यापक तुषार पाटील यांनी यावेळी केले. श्री. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या मिळाल्यामुळे शिक्षण सुलभ होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी महेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना केली. याप्रसंगी मुख्याध्यापक तुषार पाटील, पत्रकार भास्कर सोनवणे, रुग्णमित्र निवृत्ती गुंड पाटील आदींसह शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!