
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र युवा नेते जयप्रकाश उर्फ बाळासाहेब शिवराम झोले मंगळवारी २९ तारखेला धनोत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने पाथर्डी फाट्यावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांचे जल्लोषात स्वागत करून अर्ज भरण्यासाठी सदिच्छा देण्यात येणार आहे. माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र युवा नेते जयप्रकाश उर्फ बाळासाहेब शिवराम झोले यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारी नाकारली. मात्र त्यांनी हार न मानता अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक भूमिपुत्र असलेले बाळासाहेब झोले यांच्या उमेदवारीबाबत जनतेमधून सहानुभूतीची लाट तयार झाली असून अनेक जण त्यांना पाठिंबा देत आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात बाळासाहेब शिवराम झोले यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू असून ह्या निवडणुकीत ते नक्कीच आपला करिष्मा दाखवतील अशी चर्चा जोर धरत आहे.