महायुतीचे उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांचा उद्या घाटनदेवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा श्रीगणेशा : सकाळी १० वाजता पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हजर राहावे – आमदार खोसकर

इगतपुरीनामा न्यूज – महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि इतर मित्रपक्षांचे इगतपुरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रचाराचा उद्या शुभारंभ करण्यात येणार आहे. उद्या रविवारी सकाळी १० वाजता इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला जाणार आहे. यावेळी श्रीफळ फोडून विधानसभा मतदारसंघाचा दणक्यात शुभारंभ केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि इतर मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अधिकृत उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांनी केले आहे. यावेळी सर्वांना प्रचाराचे व्यवस्थापन आणि नियोजनाबाबत उत्तम मार्गदर्शन केले जाणार आहे. शुक्रवारी हिरामण खोसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून घाटनदेवीचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या प्रचाराचा धुरळा सुरु होणार आहे. मागील निवडणुकीतही त्यांनी येथूनच आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला होता. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उद्या महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर राहतील असे सांगण्यात आले.

Similar Posts

error: Content is protected !!