इगतपुरीनामा न्यूज – व्यावसायिकांची लूटमार करण्यासाठी दरोडा टाकण्याची पूर्वतयारी केली. धारदार चाकू, चॉपर जवळ बाळगत एकत्र जमून दरोडा टाकण्याची तयारी केली म्हणून ५ संशयित आरोपींना इगतपुरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस शिपाई प्रकाश ज्ञानदेव कासार यांनी भादवि कलम 399, 402 सह भा. ह. का. कलम 4, 25 सह म. पो. का.कलम 37 (1) (अ) 135 नुसार फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार इगतपुरी पोलीस ठाण्यात गु. र. नं. 199/2023 दाखल करण्यात आला आहे. ह्या प्रकरणी संशयित आरोपी सचिन सुभाष म्हसणे, वय २५, रा. फांगुळगव्हाण, शंकर दिलीप लांडेकर, वय २२, रा. लेखानगर, सिडको नं. १, झोपडपटटी नाशिक, सागर मोहन माळी, वय १८, रा. निळीमाडी, घोटी, स्वप्नील एकनाथ घारे, वय १८, रा. पोस्ट ऑफीस जवळ घोटी, विठ्ठल काशीनाथ आवाली, वय २१, रा. खंबाळेवाडी यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास इगतपुरी येथील घाटनदेवी मंदीर परिसरात संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि पोलीस पथक पुढील तपास करीत आहेत.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group