ग्रामसेवक संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी दिपक पगार तर सचिवपदी रामेश्वर बाचकर यांची निवड : तालुका महासंघ अध्यक्षपदी विजयराज जाधव

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

इगतपुरी तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने इगतपुरी येथे सेवानिवृत्त झाल्याबद्दल ग्रामसेवक ईश्वर पाटील यांचा सेवापुर्ती कार्यक्रम इगतपुरी पंचायत समितीमध्ये संपन्न झाला. इगतपुरी तालुक्यात नव्याने हजर झालेले व बदली करून गेलेले ग्रामसेवक बंधू भगिनी यांचे स्वागत व निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेची इगतपुरी तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे, जिल्हा महासंघाचे अध्यक्ष अरुण आहेर, पतसंस्था कोषाध्यक्ष प्रमोद ठाकरे, ग्रामसेवक तलु काका, पारधी व सर्व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणीची निवड खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. 

इगतपुरी तालुकाध्यक्षपदी दिपक पगार, सचिवपदी रामेश्वर बाचकर, कार्याध्यक्ष हनुमान दराडे, उपाध्यक्षपदी घडवजे भाऊसाहेब, महिला उपाध्यक्षपदी सुरेखा चव्हाण, महिला सहसचिवपदी कलंकार, कायदेशीर सल्लागारपदी ऋषीकेश नागरे व तालुका महासंघाचे अध्यक्ष म्हणून विजयराज जाधव यांनी बिनविरोध निवड झाली. नूतन पदाधिकाऱ्यांनी इगतपुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!