
इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे येथील माध्यमिक विद्यालयाच्या शालेय विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या अनुषंगाने जनजागृतीचे संदेश दिले. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केलेल्या जनजागराचा लोकांमध्ये ठसा उमटला. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. अंमली पदार्थ विरोध, व्यसनमुक्ती व त्याच्या गंभीर दुष्परिणामाचे या सप्ताहाच्या अनुषंगाने गावातील मिश्रवस्ती, बाजार पेठ या ठिकाणाहून रॅलीद्वारे जागृती कार्यक्रम झाला. यावेळी संपूर्ण गावभर नशामुक्तीसाठी घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधव, रामनाथ दिवे, पोलीस अंमलदार भगवान खरोले, संदीप जाधव, उल्हास धोंडगे, विशाल बोराडे, विक्रम काकड, गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते.
