
इगतपुरीनामा न्यूज – आगरी समाजाचा विकास आणि उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापनेबाबत मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आगरी सेनेचे जिल्हाध्यक्ष संपत डावखर, युवा जिल्हाध्यक्ष अनिल भोपे, अरुण भागडे, भालचंद्र भागडे, शंकर भगत यांनी सर्व आगरी समाजातर्फे आभार मानले आहेत. या महामंडळाचे अध्यक्षपद आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी देण्यात यावे अशी मागणी ह्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आगरी सेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आगरी समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळ असावे अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधानपरिषदेत पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनातर्फे समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ निर्मिती करण्याच्या निर्णय झाल्याचे संपत डावखर, अनिल भोपे यांच्याकडून सांगण्यात आले. सरकारने आगरी समाजासाठी विकास महामंडळाची घोषणा केल्यामुळे या समाजाच्या उन्नतीस हातभार लागणार असल्याची भावना अरुण भागडे, भालचंद्र भागडे यांनी केली. या महामंडळाचे आधक्ष राजाराम साळवी देण्यात यावे अशी विनंती आगरी सेना नाशिक जिल्ह्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे. या निर्णयाबद्धल इगतपुरी तालुक्यात आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करून फटाके फोडले. सर्वांना पेढे भरवत मुख्यमंत्री शिंदे यांचे ऋण व्यक्त करण्यात आले.
