नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी – कंटेनर चालकाला बेशुध्द करुन लुटणाऱ्या टोळीतील १० जण गजाआड ; गुन्ह्यातील वाहनासह कंटेनर व बिअर बॉक्स हस्तगत : जिल्ह्याच्या विविध भागातील आरोपींचा समावेश

इगतपुरीनामा न्यूज, दि. 7

घोटी पोलीस ठाण्यात कलम 395, 343, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. ह्या गुन्ह्यात आरोपीतांनी फिर्यादीचा कंन्टेनर एमएच 43 बीजी 5463 मध्ये गंगापुर जि. औरंगाबाद येथुन बसुन सिन्नरच्या पुढे आल्यावर शिवीगाळ, दमदाटी करुन नाशिकरोड व सिन्नर असा फिरवुन आणला. सिन्नर घोटी रोडला एचपी पेट्रोलपंपाजवळ उभा करुन आर्टिका गाडी एमएच 04 एफएफ 6351 मधुन आलेल्या आणखी साथीदारांनी फिर्यादीला बेशुध्द केले. त्याच्या ताब्यातील कंटेनर व त्यातील किंगफिशर बियरचे 2200 बॉक्स घेवुन जावुन फिर्यादीला नाशिक येथे डांबुन ठेवले. पुन्हा हरसुल जवळ एका ठिकाणी घेवुन जावुन कंन्टेनर मधील बियरचे बॉक्स खाली करुन 20 लाखांचा कंटेनर व 43 लाख 29 हजार 856 रुपयाचे किंगफिशर 2200 बियरचे बॉक्स असा एकुण 63 लाख 29 हजार 856 रुपयाचा माल बळजबरीने चोरी करुन घेवुन गेले. गुन्ह्याचा तपास घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर करत आहेत.

ह्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान नांदगाव येथे बियरच्या बाटल्याचा मोठा साठा शेतामध्ये ठेवलेला आहे अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेथून पिकअप गाडी, बियरच्या बाटल्याचा साठा व आरोपी दिपक बच्छाव यास ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे सखोल विचारपुस करता असाच माल त्याने आरोपी निलेश जगतापच्या सांगण्यावरुन मनमाड येथे ठेवल्याचे सांगितले. त्यावरुन मनमाड येथील अस्तगाव या ठिकाणावरुन बियरच्या बाटल्याचा साठा जप्त करण्यात आला. तपासा दरम्यान दुसऱ्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी निलेश जगताप व त्याचा भाऊ यास ताब्यात घेवुन विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हा करण्यासाठी बरोबर असलेल्या इतर आरोपीतांची, फिर्यादीस डांबुन ठेवलेल्या ठिकाणाची माहिती व गुन्ह्यातील मुद्देमाल त्र्यंबक, हरसुल येथे वाहतुक करण्यासाठी मदत केलेल्या इतर साथीदारांच्या नावांची माहीती दिली. गुन्ह्यातील किंगफिशर स्ट्रॉग बियरचे बॉक्स, चोरी करण्यासाठी वापरलेला आयशर टेम्पो एमएच 15ईजी 8566, पिकअप गाडी एमएच 15 एचएच 8566, आर्टीका गाडी एमएच 04 एफएफ 6351, पेठ पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरी केलेला कंन्टेनर एमएच 43 बीजी 5463 असा एकुण 55 लाख 22 हजार 936 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हा करणाऱ्या 10 आरोपीतांना अटक करण्यात आली असुन आतापर्यत एकुण 1054 बियर बॉक्स हस्तगत करण्यात आले आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या सुचनांप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, कविता फडतरे यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनी मयुर भामरे व टिम, घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व टिम यांनी केलेली आहे.ह्या तपासाकामी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक शशिकांत गर्जे, उपनिरीक्षक सुनिल देशमुख व पथकाचे देखील सहकार्य लाभले. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी ह्या कामगिरी बाबत कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करुन रुपये 15 हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे.

हे आहेत अटक करण्यात आलेले आरोपी
निलेश विनायक जगताप, वय 35
आकाश उर्फ सोनू विनायक जगताप, वय 32
दोघे रा. भारतभूषण सोसायटी, प्लॉट न. 44, पवारवाडी, जेलरोड, नाशिकरोड
चेतन अशोक बिरारी वय 32 रा. जे. के. इनक्लु फ्लॅट न. 104 आरटीओ जवळ, पंचवटी, नाशिक
दिपक शिवाजी बच्छाव वय 31,
महेश शिवाजी बच्छाव वय 28
दोघे रा. घर न. 155, त्रिमुर्तीनगर, हिरावाडी पंचवटी, नाशिक,
विकास उर्फ विकी भिमराव उजगरे, वय 26 रा. बिल्डींग नंबर बी 4, रुम नंबर डी 60, घरकुल चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक
धीरज रमेश सानप,वय 30, रा. स्वप्नपुर्ती अपार्टमेन्ट, फ्लॅट नंबर 302, मानसे कंपाऊंड, मनमाड, ता. नांदगाव
गणेश निंबा कासार वय 38 रा. घर नंबर 595, मुक्तांगण गार्डेन, मनमाड ता. नांदगाव
मनोज उर्फ पप्पु शांताराम पाटील वय 32 रा.एन, एल.ए 6-42/1 गणेश चौक, सिडको नाशिक

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!