राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश : नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

 इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पदाधिकाऱ्यांची पदांवर नियुक्ती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष बहीरु पाटील मुळाणे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण मेढे, नाशिक लोकसभा चिटणीस हरीभाऊ बोडके, पंचायत समिती सदस्य रविंद्र भोये, युवक तालुकाध्यक्ष कैलास मोरे, कार्याध्यक्ष देवा बेंडकोळी आदी उपस्थित होते.

तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश करणाऱ्यांचे सत्कार पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी साप्ते येथील गणपत दामु जाधव, किसान सेलच्या तालुकाध्यक्षपदी वाढोली येथील आत्माराम महाले, अंजनेरी गटप्रमुखपदी भाऊसाहेब महाले, युवक उपतालुकाध्यक्षपदी अंबोली येथील तानाजी मेढे, हरसुल येथील  महेश लांघे युवक सरचिटणीस पदी, तोरंगण येथील दिपक बोरसे, शिरसगाव येथील अरूण महाले, गोलदरी येथील दिलीप डोकफोडे यांची युवक राष्टवादीच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी संजय महाले, त्र्यंबकराव महाले, मनोहर बेंडकुळी, भिका भोई, खंडु उघडे, अनिल भोई, सोमनाथ बुचडे, हरिश्चंद्र वाळवे, वाळु भोई, संदीप गवते, विजय भोई, विजय जाधव आदी उपस्थित होते.