मुस्लिम भगिनींच्या दहीहंडीत सहभागाने आनंद द्विगुणित : कळसुबाई मित्र मंडळातर्फे कपारेश्वर महादेव देवस्थानात दहीहंडी संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१

इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथे निसर्गाच्या  सानिध्यात, प्राचीन काळापासून कपारीत असलेल्या कपारेश्वर महादेव देवस्थानात कळसुबाई मित्र मंडळाने दहीहंडी उत्सव साजरा केला. गोपाळकाल्या निमित्त कु. कृष्णा बोऱ्हाडे ह्याने बालकृष्णाचा पेहराव परिधान करून आकर्षण वाढवले. या बालकृष्णासह कपारेश्वर महादेवाचे पूजन सायरा खलिफा, नगमा खलिफा या दोघी मुस्लिम भगिनींनी केले. मुस्लिम भगिनींच्या सहभागाने उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. चिमुरड्या बालकृष्णाने दहीहंडी फोडून धार्मिक, सामाजिक एकोपा ठेवण्याचा संदेश सर्वांना  दिला.

कोरोनाचे नियम पाळून मोठ्या उत्साहात कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी अनोख्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला. यावेळी दहीरूपी माखनचा प्रसाद उपस्थितांना देण्यात आला. या कार्यक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, सुरेश कडू, बाळासाहेब आरोटे, गजानन चव्हाण, बाळासाहेब चौधरी, काळू भोर, प्रवीण भटाटे, अशोक हेमके, डॉ. महेंद्र आडोळे, सुरेश चव्हाण, बालाजी तुंबारे, गोकुळ चव्हाण, संतोष म्हसणे, उमेश दिवाकर, सोमनाथ भगत, दीपक कडू, पुरुषोत्तम बोऱ्हाडे, जनार्दन दुभाषे, धनंजय बोऱ्हाडे, रमेश हेमके, भाऊसाहेब जोशी, सर्व्हेश मैले, गणेश काळे, प्रकाश तोकडे, गिर्यारोहक, बालगोपाल, महिला भगिनी सहभागी झाले होते.

सामाजिक एकोपा आणि समरसता निर्मित करण्यासाठी आपले कल्याणकारी उत्सव सर्वांना प्रेरणा देतात. कोरोनाचे नियम पाळून आज झालेला उत्सव निरामय आनंद देऊन गेला. मुस्लिम भगिनींनी घेतलेला सहभाग उत्साह द्विगुणित करणारा ठरला.

- भगीरथ मराडे, अध्यक्ष कळसुबाई मित्र मंडळ

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!