
इगतपुरीनामा न्यूज – नाशिकच्या दिशेने मुंबईकडे जाणाऱ्या स्कार्पिओ वाहनाला मुंबई आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हेजवळ प्रणाम हॉटेल भागात अपघात झाला. अचानक टायर फुटल्यामुळे हे वाहन उलटून अपघातग्रस्त झाले. आज पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. MH 18 W 5855 असा अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक आहे. ह्या अपघातात वसिम लतीफ बागवान वय ३४, अहमद रजा वय १८, समशेर रजा वय ४०, इस्रार अहमद, शेख हापीज वय ४८, बदरूनिसा वय ४५, जमील भानू वय ४२, ईकरा शेख वय १७, फरहान शेख वय १४, आफिक शेख वय ११ हे १० जण जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेने समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सुदैवाने सर्वांचा प्राण वाचला आहे.