गोवर्धने विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य जयंत गोवर्धने, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एस. बी. फाकटकर  उपस्थित होते. प्राचार्य डॉ.पी. आर. भाबड यांनी याप्रसंगी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रगीत व ध्वजगीत महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी सादर केले. कार्यक्रमाला एनसीसी, एनएसएस, विद्यार्थी कल्याण मंडळाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एच. आर. वसावे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक एनसीसी प्रमुख प्रा. एस. एस. परदेशी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. एस. बी. फाकटकर यांनी केले.