कवी – निलेश तुळशीराम भोपे, 7507131266
चल शाळेला चल ग तारा,
नको राहू तु आपुल्या घरा |
चल शाळे जाऊ, मिळू नाचू गाऊ
खेळ संगतीन खेळूया सारा ||धृ||
तिथे वाचूया पुस्तकातला धडा,
लिहू पाटीवर गणिताचा पाढा |
शिक्षणाची गोडी, तुम्हा आम्हा जोडी
मूलमंत्र हा प्रगतीचा खरा ||१||
जर शाळेला आली तु नाही,
त्या जगण्याला अर्थच नाही |
नीट समज बाळा, शिक्षणाचा लळा
नको देऊ तु अज्ञाना थारा ||२||
चल तारा तु शाळेला चाल गं,
कर उंच तु देशाची मान गं |
हो अधिकारी तु घेऊन शिक्षण, कर तूच आता देशाचं रक्षण
होशील देशाच्या मानाचा तुरा ||३||
चल शाळेला चल चल तारा,
शोध तुझ्यातला ज्ञानाचा हिरा
नको घरी राहू, पैशामागे धावू
उघड प्रज्ञानाच्या दारा ||४||