इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे जवळ मुंबई आग्रा महामार्गावर फॅब कंपनीच्या समोर असलेल्या जंगलामध्ये एक अनोळखी इसमाचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रेत ३५ ते ५० या वयोगटातील इसमाचे असून प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटू शकली नाही. ह्या मयत इसमाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे. याबाबत कुणाला काहीही माहिती असल्यास वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राजू पाटील अथवा आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group