
इगतपुरीनामा न्यूज – शहीद दिनानिमित्त वीरनारी वीरमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व प्रहार सैनिक कल्याण संघाच्या वतीने शौर्य सन्मान सोहळा व इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार नाशिक येथे उत्साहात झाला. यावेळी इगतपुरीकंगे समाजसेवक पत्रकार राजु देवळेकर यांना मान्यवरांच्या हस्ते इगतपुरी रत्नगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयहिंद जनजागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत राऊत, माजी सैनिक विजय कातोरे, उमा कुलकर्णी, ज्योती पेंडसे, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नारायण जाधव, सुनील महाराज गाडेकर, माजी सैनिक संघटना अध्यक्ष विजय पवार, गिरीश पाटील, वीरमाता ज्योती राणे, मिनल मोदी, स्नेहा हरमळकर, पिसारनाथ कामत, सुनील जाधव आदी उपस्थित होते. राजू देवळेकर यांचे इगतपुरी तालुक्यासह जिल्हाभरात आरोग्य, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील गोरगरीब जनतेला मदत करण्याचे मोठे कार्य आहे. शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांना आवश्यक ती मदत ते देत असतात. पात्र आणि योग्य व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार मिळाल्यामुळे व्यापारी असोसिएशनचे अजित लुणावत, मनोहर शिंगाडे, नितीन चांदवडकर, पत्रकार पोपट गवांदे, रत्नदीप बिर्जे, सुमित बोधक, अभय पार्टे, रॉकी वाटेकर, शैलेश पुरोहित, प्रसाद अय्यर, निखिल कर्पे, प्रवीण भटाटे यांनी अभिनंदन केले. प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विजय कातोरे, वीरनारी वीरमाता बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापकीय अध्यक्षा रेखा खैरनार, सचिन शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.