
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील आडवण येथील कु. रवींद्र भगवान शेलार हा मुलगा हरवला आहे. हा मुलगा थोडासा मंद्बुद्धी असून अंगात पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट, डोक्यात गांधी टोपी आहे. घोटी सिन्नर महामार्गावरील गावांतून हा मुलगा गेला असल्याचा अंदाज आहे. त्याचे आईवडील आणि संपूर्ण कुटुंब हवालदिल असून त्याचा शोध घेत आहेत. हा मुलगा कुठेही दिसल्यास 8379044140, 9765559844 यावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.