
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर व्हिटीसी फाट्याजवळ आज दुपारच्या सुमारास अज्ञात कंटेनरने कार क्रमांक MH 15 EX 1688 ला कट मारला. त्यामुळे कारण पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कमलाकर शिंदे वय ५३, अरुण भामरे वय ५०, माणिक योगेश सावकारे, अनिल रामभाऊ जाधव वय ४८ सर्व रा. नाशिक हे ४ प्राथमिक शिक्षक गंभीर जखमी झाले. हे सर्वजण इगतपुरी तालुक्यातील वाघेरे केंद्रातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असल्याचे कळते. घटनेची माहिती समजताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे चार व्यक्तींना जीवदान मिळाले आहे. या अपघातामुळे ५ जानेवारी २०२२ ला मुंढेगाव फाट्यावर झालेल्या शिक्षकांच्या भयानक अपघाताची आठवण अनेक शिक्षकांना आली.