
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे एका २१ वर्षीय नर्सने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. चित्रा भांगरे असे दुर्दैवी नर्सचे नाव असून ती तालुक्याच्या ग्रामीण भागातील एकदरा येथे राहणारी युवती होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून अस्पष्ट आहे. घोटी येथील एका खाजगी दवाखान्यामध्ये ही युवती नर्सचे काम युवती करत होती. घोटी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून युवतीला पुढील उपचारासाठी घोटी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.