सिमा देवगिरे यांची पिंपळगाव घाडगाच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज – पिंपळगाव घाडगा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. रोटेशन पद्धतीने रिक्त झालेल्या जागेवर सिमा रमेश देवगिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच देविदास देवगिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडली. ग्रामपंचायत सदस्य बहिरू घाडगे, ज्ञानेश्वर आहेर, गुलाब जाधव, अंजना जोशी, रोहिणी  आहेर, मंगेश मेंगाळ ,आशा मधे, सत्यभामा मेंगाळ, ग्रामसेवक अमोल भामरे उपस्थित होते. आमदार हिरामण खोसकर, माणिकराव कोकाटे, मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे, कचरू शिंदे, पांडुरंग शिंदे यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!