इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
मुंबई आग्रा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे आज पुन्हा दिसून आले. वाडीवऱ्हे पासून पुढे असणाऱ्या रायगडनगर जवळ आज रात्री सव्वाआठ वाजता MH 15 EB 2619 ह्या वाहनाचा अपघात झाला. रस्त्यावरून गाय अचानक आडवी आल्याने घोटीकडून नाशिककडे जाणारे हे वाहन अपघातग्रस्त झाले. हे वाहन थेट दुसऱ्या बाजुच्या रस्त्याकडे फेकले गेले. या अपघातात घोटी येथील ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ह्याचवेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके येथून प्रवास करत होते. त्यांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत केली. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. सुदैवाने ५ ही जणांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. या घटनेत आशिष अनिल चोरडिया वय ३०, गौतम पीचा वय ५४, संकेत ( पूर्ण नाव नाही ) आणि इतर दोघे ( नावे समजली नाही ) सर्व रा. घोटी हे किरकोळ जखमी झाले आहेत.