इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
काळूस्ते गणातील तमाम नागरिकांचा आशीर्वाद आणि शिवसेना, आगरी सेना यांची अनमोल मदत ह्या त्रिवेणीसंगमातून उपसभापती पदापर्यंत मजल मारता आली. मी सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो. आगामी काळात संपूर्ण इगतपुरी तालुक्यातील विकासासाठी जीव ओतून काम करीत राहील असे अभिवचन नवनिर्वाचित उपसभापती विठ्ठल लंगडे यांनी दिले. उपसभापती पदावर निवड झाल्यानंतर ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून विठ्ठल लंगडे यांना शुभेच्छा दिल्या.
इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काळूस्ते गणाचे सदस्य विठ्ठल भगीरथ लंगडे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केल्यानंतर समर्थकांनी जल्लोष केला. इगतपुरी पंचायत समितीच्या सदस्यांची मुदत अवघी काही महिने असून आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आज खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समितीवर शिवसेनेची अबाधित सत्ता असल्याने आतापर्यंत तिघा सदस्यांना सभापतीपद पाच सदस्यांना उपसभापतीपद भोगायला मिळालेले आहे.
इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी आज इगतपुरी येथे निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. उपसभापती पदावर शिवसेनेचे गटनेते विठ्ठल भगीरथ लंगडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडीच्या बैठकीवेळी सभापती सोमनाथ जोशी, मावळत्या उपसभापती विमल तोकडे, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, पंचायत समिती सदस्य विमल गाढवे, कौसाबाई करवंदे, मश्चिंद्र पवार उपस्थित होते.
निवडीनंतर पंचायत समिती सभागृहात सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. व्यासपीठावर आगरी समाजाचे जेष्ठ नेते गणपत कडू, सभापती सोमनाथ जोशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार निर्मला गावित, काशीनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष नयना गावित, जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, हरिदास लोहकरे, कावजी ठाकरे, माजी सभापती जया कचरे, माजी तालुका प्रमुख राजेंद्र नाठे, रमेश धांडे, रंगनाथ कचरे, माजी उपसभापती विष्णू चव्हाण, कचरू डुकरे, सुनील जाधव, मथुरा जाधव, उपसरपंच रामदास भोर, रामदास शेलार, प्रशांत कडू, भाऊराव भागडे, तात्यापाटील भागडे उपस्थित होते. याप्रसंगी हरिश्चंद्र चव्हाण, नगरसेवक संपत डावखर, देवराम म्हसणे, सूर्यकांत भागडे, नंदराज भागडे आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच अनिल भोपे, हरिश्चंद्र चव्हाण, कैलास भगत, कैलास कडू, रामदास गव्हाणे, सतीश गव्हाणे, अशोक सुरुडे, रमेश शिंदे, हिरामण कडू, अंबादास धोंगडे, हनुमंता गायकवाड, संजय राऊत आदींसह तालुक्यातील शिवसैनिक, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल भोपे यांनी केले.
इगतपुरी तालुक्याच्या विकासासाठी अविरत कार्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करील. सर्वांचे मार्गदर्शन घेऊन विकासाचा रथ पुढे नेईल. जनतेला आश्वस्त करून माझे उत्तरदायित्व पार पाडणार आहे.
- विठ्ठल लंगडे, नूतन उपसभापती इगतपुरी