इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
मुंबई आग्रा महामार्गावर सुरू असलेले अपघातांचे सत्र थांबायला तयार नाही. आज दुपारी १ वाजता वाडीवऱ्हे येथील फॅब कंपनीजवळ मोटरसायकल पंचर झाल्याने अपघात झाला. यामध्ये देविदास वसंत कांबळे वय ४१, ज्योती देविदास कांबळे, विधी देविदास कांबळे वय ९,समन्वयक देविदास कांबळे वय १ वर्ष सर्व रा. वाडीवऱ्हे हे जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.