गोंदेजवळ मोटारसायकल अपघातात ३ कामगार युवक गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 23

आज सकाळी गोंदे औद्योगिक वसाहतीतील नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर दोन मोटारसायकल समोरासमोर आल्याने धडकल्या. ही घटना सव्वा सात वाजता घडली. यामध्ये 3 कामगार युवक गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. लक्ष्मीकांत उत्तम दर्वे वय 25 रा. माणिकखांब, शरद कुंडलिक कुंदे वय 27 रा. सोमज, नामदेव हरिश्चंद्र शेलार वय 40 रा. आडवण अशी जखमींची नावे आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!