
इगतपुरीनामा न्यूज – शिवजयंतीच्या मुहुर्तावर माणिकखांबपासून एक किमीवरील ओलंडवाडी या वस्तीला २४ तास पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने वाडीतील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही या वाडीतील नागरिक पाण्यापासुन वंचित होते. महामार्ग ओलांडत जीव धोक्यात घालून येथील महिलांना पाणी आणावे लागत होते. या महिलांची समस्या ओळखून माणिकखांबच्या सरपंच अंजनाबाई चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य शाम चव्हाण, त्यांचे सर्व सहकारी यांनी पाठपुरावा केला. या महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवून पाण्याची २४ तास पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. या वस्तीतील महिलांनी सरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी सरपंच अंजनाबाई चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य शाम चव्हाण, पिंटू चव्हाण, संजय भटाटे, सुकराज म्हसणे, गंगाराम गांगड, आगरी समाज विश्वस्त सचिव भोलेनाथ चव्हाण, भारत भटाटे, माजी सरपंच ज्ञानेश्वर भटाटे, तंटामुक्त अध्यक्ष रामदास चव्हाण, भगवान चव्हाण, माजी सदस्य संतोष चव्हाण, निवृत्ती चव्हाण, रमेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते वसंत चव्हाण, गोकुळ आडोळे, गोटीराम चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, राजु भोईर, नवनाथ चव्हाण, कृष्णा आडोळे, बाळकृष्ण जोशी, निवृत्ती चव्हाण, अशोक भटाटे, मंगळु चव्हाण, सुरेश चव्हाण, भगवान भटाटे, सोपान चव्हाण, अशोक चव्हाण, सचिन चव्हाण, दशरथ चव्हाण, पिंटु चव्हाण, सुरेश चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.