इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार पाणी परवानग्या : प्रहार दिव्यांग संघटनेच्या पाठपुराव्याला मिळाले यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

इगतपुरी तालुका प्रहार संघटनेने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांना पाणी परवानगी मिळावी यासाठी गेल्या महिण्यात निवेदन दिले होते. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्ष सपन परदेशी यांनी ह्याबाबत ना. बच्चू कडू यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केला. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रहार संघटनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांशी समन्वय आणि चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे सुचवले होते. त्यानुसार शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून शेतकरी बांधवांना पाणी परवानगी मिळण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आवश्यक ती पूर्तता करून घेऊन शेतकऱ्यांना पाणी परवानगी आणि वीज जोडणीबाबत निर्णय घेणार असल्याचे कार्यकारी अभियंत्यांच्या बैठकीत सांगण्यात आले.

राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांच्या सूचनेनुसार प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळासोबत पाटबंधारे विभाग नाशिकचे कार्यकारी अभियंता आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी दीर्घ बैठक झाली. बैठकीत ठरल्याप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांना लवकरच फॉर्म नंबर ७ भरुन पाणी परवानगी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले. यासह शेतकरी बांधवांना विज जोडणी उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी पाटबंधारे विभागाकडून येत्या आठवड्यात शेतकरी बैठक घेण्यात येणार आहे. ह्या बैठकीत फॉर्म ७ भरुन शेतकरी बांधवांना पाणी परवानगी उपलब्ध करून विज कनेक्शन मिळणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांनी इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी निवेदानुसार दखल घेतल्याने प्रहार संघटनेतर्फे आभार मानण्यात आले. बैठकीवेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्ष सपन परदेशी, प्रसिद्धी प्रमुख मंगेश शिंदे, खंडु परदेशी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!