इगतपुरीनामा न्यूज, दि. 16
इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरापासून सिन्नर हायवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर घोटी गावापासून काही अंतरावर असणाऱ्या श्श्रीकांत भदे यांच्या घरावर शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान 7 ते 8 दरोडेखोरांनी दरोडा घातला आहे. यात घरातील सुमारे 10 तोळे सोने व 1 लाख रुपये रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत घरमालक श्रीकांत भदे, त्यांचे वडील जयवंत बदे व आई अलका भदे या जखमी झाल्या आहेत. त्यांना घोटी येथील लोकमान्य हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे वरील तिघांचीही प्रकृती स्थिर आहे. दरोडेखोरांनी श्री. भदे यांच्या घरापासून जवळ असणाऱ्या जावेद गनी खान यांच्या घरावर देखील दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी श्री. खान यांच्या डोक्यावर तलवारीने केलेल्या वारामध्ये जावेद गणी खान हे जखमी झाले. त्यांना नाशिकच्या राणे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. श्री. खान यांची देखील प्रकृती स्थिर असून घटनास्थळी घोटी पोलीस दाखल असून पोलीस तपास सुरू करण्यात आलेला आहे.