इगतपुरीनामा न्यूज – आडवण, पारदेवी येथील होणाऱ्या एमआयडीसीमुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे. शेतकऱ्यांकडे उपजिवीकेचा पर्याय राहणार नाही. यासह स्वच्छ असणाऱ्या दारणा नदीत कारखान्यातील रासायनिक व दुषित पाणी जाणार आहे. म्हणुन या प्रकल्पाला शिवशाही संघटनेचा विरोध आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रोहीत उगले दारणा काठावर वसलेल्या गावागावात जाऊन जनआंदोलन करून जनजागृती करणार आहेत. दारणेचा उगम बहुतांशी आडवण पारदेवी त्रिंगलवाडी या भागात होतो. लाभक्षेत्रात आडवण, पारदेवी, बलायदुरी, त्रिंगलवाडी, टाकेघोटी, कांचनगांव, घोटी, खंबाळे, औचितवाडी, शेणवड, खडकवाडी, खैरगांव, देवळे, दौंडत, माणिकखांब, मुंढेगांव, वाघेरे, सोमज, मोगरे, उभाडे, पिंपळगांव मोर, घोटी खुर्द, कवडदरा, धामणी, धामणगांव, समनेरे, मालुंजे, साकुर, नांदगांव बुद्रुक व १२ वाड्या आदी गांवे येतात. या भागातील मुख्य व्यवसाय शेती आहे. हा प्रकल्प झाल्यास कारखान्यातील दुषित सांडपाणी, रासायनिक पाणी दारणा नदीत मिसळून नदी दुषित होईल. यामुळे जनतेला विविध आजारांना सामोरे जावे लागेल. संभाव्य दुष्परिणाम टाळण्यासाठी जनतेच्या हिताचा विचार करता होणारा प्रकल्प येथून रद्द करून अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा अशी मागणी ॲड. रोहीत उगले यांनी केली आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group