वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
दिवाळी सण सर्वत्र होत असला तरी आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांच्याबरोबर तेजोमय दिवाळी साजरी करण्यात वेगळाच आनंद असतो. आदिवासी पाड्यावर आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून व आदिवासी बांधवांची दिवाळीही गोड व प्रकाशमय व्हावी या हेतूने श्री साई सहाय्य समितीचे अध्यक्ष राजु देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील काराचीवाडी येथील आदिवासी बांधवांना दिवाळी निमित्त मिठाई व कपडे वाटप करण्यात आले. यावेळी समितीच्या सदस्यांनी या आदिवासी बांधवांमध्ये रमुन त्यांचा आनंद द्विगुणीत केला.
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील काराचीवडी येथे श्रीसाई सहाय्य समिती व प्रभुनयन फाऊंडेशन मुंबई यांनी आदिवासी बांधवाना फराळ, मिठाई, फटाके वाटून त्यांच्या घरासमोर दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी केली. यावेळी राजु देवळेकर, अभय पार्टे, नितीन चांदवडकर, सुमित बोधक, जुबेर पठाण, कृष्णा निकम, आकाश शर्मा, सौरभ बरहे, प्रमोद डेंगळे, नितीन शुक्ला, सौरभ सिंग, भूमी चांदवडकर, नयना ठाकरे, प्रिया शुक्ला, काजल सिंग, अमन संघा, रमण संघा, माही चांदवडकर, सई बहरे आदी उपस्थित होते.