नागोसली ग्रामपंचायतीत कामांचा धडाका : नळपाणी योजना, सभामंडप कामाचे खासदारांच्या हस्ते भूमिपूजन

इगतपुरीनामा न्यूज – नागोसली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर विकासकामांना धडाक्यात सुरुवात झाली आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेसाठी ७० लाख ४९ हजार खर्चाच्या योजनेचे भूमिपूजन खासदार हेमंत गोडसे, सरपंच काशिनाथ होले, उपसरपंच अशोक शिंदे यांच्या हस्ते झाला. जागृत देवस्थान मारुती मंदिर येथील सभा मंडप कामासाठी १५ लाख मंजूर असून ह्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले. नागोसली ग्रामपंचायत हद्धीतील कुठल्याही विकास कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. दिलेल्या निधीचा पुरेपूर चांगल्याप्रकारे वापर केला जावा. विकासासाठी ग्रामपंचायतीला खासदार म्हणून संपूर्ण सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन खासदार हेमंत गोडसे यांनी दिले. यावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हजर होते.

विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी लोकनियुक्त सरपंच काशिनाथ होले, उपसरपंच अशोक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश आनंदा धापटे, सुमनबाई लक्ष्मण मुतडक, कणिता संजय होले, शिंदे गट विधानसभा संपर्कप्रमुख कुंडलिक जमधडे, उपतालुकाप्रमुख संदीप शिरसाट, युवासेना उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर जमधडे, गटप्रमुख विश्वास खातळे, गणप्रमुख विश्राम पोरजे, युवासेना गटप्रमुख योगेश तांबे, शेतकरी सेना उपतालुकाप्रमुख सोमनाथ जाधव, युवासेना संघटन प्रमुख सचिन कुटके, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख गोकुळ जाधव, शेतकरी सेना गणप्रमुख अशोक महाले, आदिवासी सेल गटप्रमुख विजय पुराने, पोलीस पाटील कुंडलिक ताठे, ढवळू होले, दत्तू पाटील शिंदे, ज्ञानेश्वर शेलार, धर्मा खोडके, चंदर गिऱ्हे, पंढरी होले, वसंत ताठे, बाळू ताठे, कैलास ताठे, बाळू डोळस, देवराम राऊत, निवृत्ती शिंदे, लक्ष्मण शिंदे, शाम शिंदे, नामदेव जोंधळे, ग्रामसेवक संभाजी मार्कंडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!