इगतपुरी तालुका शेतकरी विकास सहकारी संस्थेच्या १५ जागांसाठी निवडणूक घोषित

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका शेतकरी विकास सहकारी संस्थेचा संचालक सदस्यांचा कालावधी संपत असल्याने २०२३ ते २०२७ नवीन कार्यकारीणी निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती तालुका सहकारी निवडणुक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अर्चना सौंदाणे यांनी दिली आहे. नामनिर्देशन पत्र २१ डिसेंबर पासुन भरण्यास सुरुवात झाली असुन शेवटची तारीख २८ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरता येईल. २९ डिसेंबरला सकाळी ११ वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. १ जानेवारी २०२४ रोजी वैध नामनिर्देशनपत्रांची प्रसिद्धी निवडणुक कार्यालयात करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १ ते १५ जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असणार आहे. १६ जानेवारीला उमेदवारांना निशाणी वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान दिनांक २१ जानेवारीला होणार त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे. मोजणीचे ठिकाण निवडणुक निर्णय अधिकारी नंतर घोषित करणार आहेत. या संस्थेत एकुण १५ जागा असुन ७ जागा सर्वसाधारण उमेदवारासाठी, ३ जागा सहकारी संस्था, बचतगट, मंडळे व इतर संस्थेसाठी राखीव आहे. २ जागा महिला प्रतिनिधीसाठी राखीव, १ जागा अनु जाती/जमाती सदस्यासाठी राखीव, १ जागा इतर मागास वर्गीय सदस्यासाठी राखीव, १ जागा विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा वि. मा. प्र. साठी राखीव असणार आहे. निवडणुक अधिकारी म्हणुन संजय गायकवाड हे काम पाहणार आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!