….जर रुग्णवाहिका उभी नसती तर..किमान १० जणांचा खात्मा निश्चित होता….!

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

मुंबई आग्रा महामार्गावर कोणताही अपघात झाला तर काही क्षणात पोहोचणारी जगद्गुरू नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिका जखमींचा जीव वाचवते. अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळाल्याने जखमींचा प्राण वाचतो. अपघात झाल्यावर जखमींना रुग्णालयात नेणारी ही रुग्णवाहिका किमान १० जणांचे प्राण वाचवून स्वतः अपघातग्रस्त झाल्याची घटना उघडकीला आली आहे. गोंदे दुमाला फाट्यावर न्यूटन केलेला ट्रक अचानक सुरू होऊन जगद्गुरू नरेन्द्राचार्य संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेला पाठीमागून धडकला. जर हा ट्रक रुग्णवाहिकेला धडकला नसता तर किमान १० जणांचा बळी गेला असता. स्वामी नरेन्द्राचार्य माउलींनी त्या १० लोकांचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेवर आघात घेतला अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

मुंबई आग्रा महामार्ग म्हणजे अपघातांची साखळी समजला जातो. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिका काही क्षणात घटनास्थळी पोहोचते. गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले जाते. आतापर्यंत हजारो लोकांचा प्राण ह्या रुग्णवाहिकेच्या समयसुचकतेने वाचला आहे. रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड हे २४ तास डोळ्यांत तेल घालून “माऊलींचे” कार्य पार पाडत आहेत.

गोंदे दुमाला हा भाग अतिशय वर्दळीचा आणि गजबजलेला म्हणून ओळखला जातो. नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिका कोणत्याही प्रसंगाला धावण्यासाठी सज्जतेने उभी असते. ही रुग्णवाहिका अशीच सज्जतेने उभी असतांना “माऊलींच्या” ह्या रुग्णवाहिकेला एका ट्रकची अचानक धडक बसली. जोरात असणारी ही धडक रुग्णवाहिकेला बसली नसती तर त्या ट्रकने किमान १० लोकांचा अगदी सहज खात्मा केला असता. रुग्णवाहिका उभी असल्यानेच लोकांचा जीव वाचला म्हणून उपस्थितांनी जागेवरच “माऊलींची” कृतज्ञता व्यक्त केली.

गोंदे दुमाला फाट्यावर काळू सोनवणे यांच्या घराजवळ एका ट्रकवाल्याने आपला ट्रक न्यूटनमध्ये उभा केला. घाईगडबडीत हॅन्ड ब्रेक लावण्यास तो विसरला. भाजीपाला आणण्यासाठी संबंधित ट्रक ड्रायव्हर निघून गेला. मात्र हा ट्रक अचानक सुरू होऊन हळूहळू रस्त्याने चालू लागला. वेग धरीत असतांना ह्या ट्रकच्या अगदी समोर उभी असणारी जगद्गुरू नरेन्द्राचार्य संस्थानची मोफत रुग्णवाहिका पाठीमागून जोरात ठोकली गेली. ही रुग्णवाहिका नसती तर ह्या ट्रकने किमान १० लोकांचा जीव घेतला असता. गर्दीच्या भागात जाऊन ह्या ट्रकने भयंकर अपघात घडवला असता. स्वामी माऊलींच्या रुग्णवाहिकेवर आघात झाल्याने नागरिकांचा मात्र जीव बचावल्याने माऊलींची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

आपल्या सर्वांच्या मागेपुढे सतत "माऊली" उभे राहून कोणतेही संकट दूर करतात. ह्याचाच प्रत्यय आजच्या घटनेने आम्हाला अनुभवता आला. माऊलींच्या संकल्पनेतील रुग्णवाहिकेमुळे हजारो लोकांना जीवदान लाभले आहे. माउलींनी ट्रकचा आघात रुग्णवाहिकेवर घेऊन अनेकांचा जीव वाचवला असे म्हणावे लागेल. उपस्थित नागरिकांनी माऊलींची कृतज्ञता व्यक्त केल्याने माझ्याही डोळ्यांत अश्रू आले.

- निवृत्ती पाटील गुंड, रुग्णवाहक नरेन्द्राचार्य संस्थान

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!