इगतपुरी तालुक्यातील ४ गावे २४ तास विजेने प्रकाशमान होणार : जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या प्रयत्नांनी कुशेगावला शुभारंभ

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव, सांजेगाव ही 4 गावे 24 तास विजेमुळे उजळणार आहेत. थ्री फेज गावठाण 24 तास वीज ही योजना ह्या गावात सुरु झाली आहे. येणाऱ्या एक महिन्यात ही योजना पूर्ण होणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ह्या चार गावांसाठी 88 लाखांचा भरघोस निधी उपलब्ध करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या अथक प्रयत्नांनी हे काम आज सुरु करण्यात आले. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ, इगतपुरी त्र्यंबकेश्वारचे आमदार हिरामण खोसकर यांनी ह्या कामासाठी मोलाचे सहाय्य केले. आज कुशेगाव येथे प्रत्यक्षात कामाचा शुभारंभ झाला. ह्या कामामुळे चारही गावांमध्ये 24 तास थ्री फेज वीज मिळणार असून स्वतंत्र ट्रान्सफार्मर, स्वतंत्र विजेचे पोल बसवले जाणार आहेत. ही गावे 24 तास प्रकाशमान होणार असल्याने परिसरातून गोरख बोडके यांचे कौतुक करण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, मोडाळेचे सरपंच राहुल बोंबले, शिरसाठेचे सरपंच गोकुळ सदगीर, कुशेगावच्या सरपंच कमळाबाई बारकू सराई उपस्थित होते. यावेळी मोडाळे सोसायटीचे चेअरमन कचरू गोऱ्हे, कुशेगावचे उपसरपंच शंकर सराई, कुशेगाव सोसायटीचे चेअरमन खंडू म्हसणे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोनवणे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. चारही गावांमध्ये 24 तास वीज राहणार असल्याने परिसरातून गोरख बोडके यांचे कौतुक होत आहे. इगतपुरी तालुक्यातील हा पहिलाच प्रकल्प असून विजेची समस्या दुर झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना चांगला फायदा होणार आहे. 88 लाखांचा मोठा निधी ह्या कामासाठी मिळाल्याने अनेक समस्यापासून नागरिक मुक्त होणार आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!