
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पारुबाई सराई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. निवडीची घोषणा होताच कुशेगाव ग्रामस्थ आणि समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला. लोकनियुक्त सरपंच एकनाथ गुलाब कातोरे, ग्रामपंचायत सदस्य वंदना सोनवणे, गोटीराम हंबीर, पारू सराई, येसू सराई, कमळाबाई पारधी, ताईबाई आगिवले, बबन खडके, गणेश सराई, चिऊबाई आगिवले यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी नूतन उपसरपंच पारुबाई सराई यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.