
इगतपुरीनामा न्यूज – दौंडत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्मिता शिंदे यांची निवड झाली आहे. उपसरपंच निवडीसाठी झालेल्या बैठकीत स्मिता शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार अनिल मालुंजकर यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. बैठकीवेळी लोकनियुक्त सरपंच पांडुरंग मामा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बोराडे, जया बोराडे, रत्ना गावंडे, रुपाली उदावंत, ज्ञानेश्वर शिंदे, संजय शिंदे उपस्थित होते. घोषणा होताच सागर गावंडे, भरत शिंदे, निवृत्ती शिंदे, समाधान शिंदे, शिवाजी शिंदे, आत्माराम शिंदे, प्रकाश शिंदे, कचरू शिंदे आणि ग्रामस्थांनी जल्लोष केला. बिनविरोध निवडीचे संपुर्ण परिसरात स्वागत होत आहे.