
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भरवीर बुद्रुक येथील पती पत्नीने आत्महत्या करून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. पोटच्या मुलीने हलक्या जातीतील मुलाशी प्रेमविवाह केल्यामुळे आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. लोहाशिंगवे ता. जि. नाशिक भागात स्वतःचे जीवन नष्ट करून ही घटना घडल्याचे समजते. देवळाली कँप पोलीस ठाण्याच्या हद्धीत ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले. भरवीर बुद्रुक येथील आत्महत्या केलेल्या दुर्दैवी दांपत्याने घेतलेल्या कटू निर्णयामुळे परिसरात शोक पसरला आहे.