
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी पांडुरंग वारुंगसे यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार शिवराम झोले, जेष्ठ नेते रतन पाटील जाधव, माजी सरपंच वसंत भोसले आदींच्या उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. बेलगाव तऱ्हाळेचे सरपंच, इगतपुरी पंचायत समिती उपसभापती, घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती, नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष आणि इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपद अशी अनेक पदे त्यांनी उत्तम सांभाळली आहेत. आता त्यांच्यावर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असून त्यांना प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इगतपुरी तालुकाध्यक्ष म्हणून काम करतांना पक्षाला अभिमान वाटेल अशी उत्तम कामगिरी करण्याचा शब्द नूतन तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी यावेळी दिला.