कोरोनामुक्तीचे स्वप्न आले दृष्टीक्षेपात

इगतपुरीनामा न्युज, दि. ८

इगतपुरी तालुक्याची कोरोना रुग्णसंख्या संथगतीने कमी होतांना दिसत असून कोरोना मुक्तीचे स्वप्न दृष्टिपथात आले आहे. आज आलेल्या अहवालानुसार तालुक्यात ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून २ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात सध्या अवघ्या ५ रुग्णांवर उपचार सुरू असून आठवडाभरात तालुका कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. दरम्यान पावसाळी आजारांमुळे उद्भवलेल्या आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घ्यावेत तसेच कोरोना लक्षणे आढळून आल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.

कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!